पाचोरा कन्या विद्यालयात माता–पालक सभेचा सण; शिक्षण, संस्कार आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, कोंडवाडा गल्ली येथे दिनांक २१ जानेवारी रोजी माता–पालक सभा व संक्रांतीनिमित्त हळदी–कुंकवाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सेक्रेटरी श्रीमती रूपालीताई जाधव होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशीलराव पवार, पाचोरा नगर परिषदेच्या बांधकाम समिती सभापती सौ. प्रियंका ताई पाटील, खडकदेवळा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद गरुड, संस्थेचे विश्वस्त हर्षजीतराजे पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविकात शहरातील एकमेव कन्या विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सर्वांगीण प्रगतीचा सविस्तर आलेख सादर केला. पालकांच्या वतीने सौ. निकिता दराडे, सौ. कविता दिलीप पाटील व सौ. रेखाताई गजानन महाजन यांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
नगरसेविका सौ. प्रियंका ताई पाटील यांनी माता–पालक व विद्यार्थिनींना समयोचित व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक अंबालाल पवार यांनीही मार्गदर्शनपर विचार मांडले.
कार्यक्रमानिमित्त माता–पालकांसाठी संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा यांसह विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या मातांना बक्षिसे व संक्रांतीचा वाण देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नूतन वर्ष स्वागत समारंभात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थिनींना मेडल्स, प्रमाणपत्रे व लेखन साहित्य देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंकिता देशमुख यांनी केले, तर आभार श्रीमती पायल पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र चव्हाण, प्रा. प्रतिभा पाटील, सुरेखा बडे, संगीता बाविस्कर, अश्विनी मेश्राम, उमेश कडलग, शिवराम पाटील, शकील खाटीक व धनराज धनगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद