पारोळा पोलीस स्टेशनमध्ये मराठी पत्रकार दिनाचा सन्मानपर सोहळा
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पारोळा | प्रतिनिधी
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या योगदानाची दखल घेत पारोळा पोलीस स्टेशनतर्फे मराठी पत्रकार दिन सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक पत्रकारांचा यथोचित गौरव करून त्यांच्या सामाजिक बांधिलकीला मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमास प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात पत्रकारितेच्या भूमिकेवर सखोल भाष्य करताना सांगितले की, महाविद्यालयीन काळापासून वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यातूनच पत्रकारितेबद्दल आपुलकी वाढली. काही काळ पत्रकार होण्याची इच्छा होती; मात्र नोकरीच्या जबाबदाऱ्यांमुळे वेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या आणि पूर्वीच्या पत्रकारितेतील बदल अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाचनसंस्कृतीला आव्हान निर्माण झाले आहे. वाचकसंख्या घटत असली तरी सत्य, सामाजिक भान आणि जबाबदारी जपत पत्रकारांनी आपली भूमिका अधिक ठामपणे बजावणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शरद पाटील तसेच पोलीस हवालदार महेश पाटील यांनी पत्रकारांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे नमूद करत उपस्थितांचे आभार मानले.
Comments
Post a Comment