करिअरच्या नव्या क्षितिजांकडे प्रेरणादायी वाटचाल निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोटरी क्लबतर्फे मार्गदर्शन व्याख्यान
पाचोरा | प्रतिनिधी
रोटरी क्लब पाचोरा–भडगावच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास दिशा देणाऱ्या “करिअरच्या विविध संधी” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये करण्यात आले. समाजहिताचे सातत्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लबने विद्यार्थ्यांच्या करिअर जडणघडणीसाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.
या कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या अमर्याद संधी, बदलते शैक्षणिक प्रवाह आणि स्पर्धात्मक युगातील आव्हाने याविषयी सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
“प्रामाणिकपणा, सातत्य आणि कठोर परिश्रम या तीन मंत्रांच्या बळावर यशाचे कोणतेही शिखर गाठता येते,” असा मौलिक संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि ध्येयदृष्टी निर्माण केली.
या प्रसंगी निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सूर्यवंशी, निर्मल सीड्सचे संचालक डॉ. जे. सी. राजपूत, शाळेचे सचिव नरेंद्रसिंग सूर्यवंशी, रोटरी क्लब पाचोरा–भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, प्राचार्य गणेश राजपूत, तसेच रोटरी उपप्रांतपाल भरत सिनकर, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. स्वप्नील पाटील, पिंकी जिनोदिया, लक्ष्मण जाधव, शाळेचे जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग व समन्वयिका स्नेहल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली म्हणाले,
“एकजुटीने, सेवाभावाने आणि निष्ठेने कार्य केल्यास कोणताही सामाजिक उपक्रम यशस्वी होतो; समाजसेवेतूनच खरे समाधान मिळते.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्ताविक व आभारप्रदर्शन शाळेच्या समन्वयिका स्नेहल पाटील यांनी केले.
या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात नव्या संकल्पना, नव्या आशा आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने अधिक दृढ झाली.
Comments
Post a Comment