श्री. सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी:-
श्री. सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा येथे दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ जयंती व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती वर्षा पाटील मॅडम होत्या, तर पालक प्रतिनिधी म्हणून प्रा. जयश्री वाघ मॅडम उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांवर रुजवलेले आदर्श संस्कार तसेच स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आत्मविश्वास, ध्येयवाद व राष्ट्रभक्तीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांमधून विचारांची खोली, आत्मविश्वास व प्रेरणादायी संदेश प्रकर्षाने जाणवला. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिकच रंगतदार व प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा पाटील मॅडम यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी चारुशीला पाटील मॅडम यांनी अध्यक्षांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद