जनजागृतीचा निर्धार, शक्तिप्रदर्शनाची तयारी : जळगावात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भव्य रोड शोद्वारे एंट्री....!


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल

जळगाव प्रतिनिधी:-
जळगाव शहरात राजकीय वातावरण तापवणारा आणि महायुतीच्या शक्तिप्रदर्शनाचा ठसा उमटवणारा भव्य रोड शो आज गुरुवारी पार पडणार आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा रोड शो महायुतीच्या एकजुटीचे आणि जनतेशी थेट संवादाचे प्रतीक ठरणार आहे.
आज गुरुवार, ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता सुरू होणारा हा रोड शो छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (सुरवात) येथून प्रारंभ होऊन चित्रा चौक, भंगाळे गोल्ड चौक, सुभाषचंद्र बोस चौक, शास्त्री टॉवर चौक, पंडित नेहरू चौक मार्गे रेल्वे स्टेशन (समाप्ती) असा नियोजित मार्ग पार करणार आहे. या दरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत विकास, स्थैर्य आणि सक्षम नेतृत्वाचा संदेश देण्यात येणार आहे.
शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) या महायुतीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या रोड शोमुळे शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जळगाव नगरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त उत्साहाचे वातावरण असून, त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिक सज्ज झाले आहेत.
जिल्हा परिषद समितीचे माजी सदस्य पद्म बापू पाटील यांनी रोड शो ला शुभेच्छा दिल्या आहेत. आयोजित या कार्यक्रमातून महायुतीचा संघटित चेहरा, नेतृत्वावरील विश्वास आणि आगामी वाटचालीचा स्पष्ट संकेत देण्यात येणार आहे. जळगावच्या राजकीय पटलावर या रोड शोमुळे नवी ऊर्जा संचारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद