पाचोरात नायलॉन मांजावर पोलिसांचा कडकडीत प्रहार; ७० वर्षीय महिलेकडून घातक साठा जप्त


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक  सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी :
पाचोरा शहरात पर्यावरण, पक्षीजीवन व नागरिकांच्या जीवितासाठी थेट धोका ठरणाऱ्या नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीवर पाचोरा पोलिसांनी कठोर कारवाई करत समाजविघातक प्रवृत्तींना स्पष्ट संदेश दिला आहे.
दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०५ वाजता, सुसलनगर बाहेरपुरा परिसरात नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तातडीने छापा टाकला. या कारवाईत रहिनाबी शेख सत्तार (वय ७०) या महिलेकडून सुमारे ६ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजाचा साठा (चक्री रील) जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम २२३, १२५ सह ५ व १५ तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घातक नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक पक्षी, पशुधन व दुचाकीस्वारांचे जीव धोक्यात येत असल्याने पोलिसांनी या प्रकाराकडे गंभीरपणे लक्ष दिले आहे.
ही धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहाम तसेच पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. कृष्णा घायाळ, श्रीकांत गायकरवाड, पोकाॅं. हरिप्रसाद परदेशी, संदीप भोई, अनिल पवार व मपोकाॅं. प्रिया आहेर यांनी यशस्वीपणे पार पाडली.
नागरिकांची सुरक्षितता, पर्यावरण संरक्षण आणि जीवितहानी रोखण्यासाठी नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात अशाच कडक कारवाया यापुढेही सुरूच राहणार असल्याचा ठाम इशारा पाचोरा पोलिसांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद