रस्त्यालगतची मृत्यूची सापळे हटवा; तहसीलदार बनसोडेंचा कडक आदेश


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल

पाचोरा प्रतिनिधी:-
डोकलखेडा येथे दाम्पत्याचा वाहनासह विहिरीत पडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील रस्त्यालगत जीवितास धोका ठरणाऱ्या विहिरी, नाले, धोकादायक वळणे व खराब रस्त्यांवर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कडक आदेश तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विजय शिवाजी बनसोडे यांनी दिले आहेत.
तालुक्यातील शासकीय जागेवरील खुल्या विहिरी तात्काळ बुजविणे किंवा सुरक्षिततेसाठी संरक्षक कठडे उभारणे, तसेच खाजगी विहिरींबाबत संबंधित मालकांना सक्तीच्या सूचना देऊन सुरक्षाकठडे बांधण्यात आल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय रस्त्यांवरील धोकादायक वळणांवर नियमानुसार गतिरोधक बसविणे, शाळांच्या परिसरात वेगमर्यादा नियंत्रणासाठी आवश्यक उपाय करणे व दिशादर्शक फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पावसामुळे अथवा दुर्लक्षामुळे निर्माण झालेले रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना देत, खराब रस्त्यांमुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाणार नाही याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर निश्चित करण्यात आली आहे. संभाव्य अपघात रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असून, कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा या आदेशातून देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद