दातृत्वाचा वारसा लोकसेवेच्या माध्यमातून अखंड ठेवणार – चेअरमन अतुल भाऊ संघवी


✍️  राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा पीपल बँकेचे चेअरमन श्री. अतुल भाऊ संघवी हे दातृत्वशील नेतृत्व व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व असून, समाजासाठी मदतीची परंपरा त्यांनी सातत्याने जपली आहे आणि ती पुढेही अविरतपणे कायम राहील, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील माजी विद्यार्थी संघास दोन लक्ष रुपये रकमेच्या वॉटर कूलर व आर.ओ. सिस्टीमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी श्री. अतुल भाऊ संघवी म्हणाले की, “आमच्या वडिलांकडून चालत आलेला दातृत्वाचा वारसा आम्ही लोकसेवा व जनकल्याणासाठी पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. विद्यार्थी हितासाठी जी काही कामे करता येतील, ती पूर्ण सेवाभावाने व निःस्वार्थ वृत्तीने करण्यास आम्ही सदैव तत्पर राहू.”
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणक्रमात झालेल्या बदलांवर प्रकाश टाकला. शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांच्या हितासाठी व कौशल्याधिष्ठित शिक्षण उपक्रम राबविण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरून प्रभावीपणे राबविल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सांगितले की, महाविद्यालय व संस्था परिवार नेहमीच विद्यार्थी हितासाठी नवनवीन उपक्रम राबवत असतो. विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी शहरातील दानशूर व्यक्ती पुढाकार घेऊन सहकार्य करत असतात. याचाच उत्तम दाखला म्हणजे जय किरण प्रभाजी नागरी पतसंस्थेकडून महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर उभारण्यात आलेली दहा लक्ष रुपयांची खुली व्यायामशाळा, ज्याचा लाभ शहरातील पुरुष, महिला व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. यासाठी त्यांनी जय किरण प्रभाजी पतसंस्थेचे विशेष आभार मानले. तसेच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ वेळोवेळी नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थी हिताचे कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे ज्येष्ठ संचालक दादासाहेब सुभाषजी तोतला, अण्णासाहेब दगाजी वाघ, जय किरण नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद बांठिया, ईश्वर छगन पाटील, शिवाजी आव्हाड, बरकत भाऊ संघवी, दत्ता बोरसे, राजेश जैन, रवींद्र पाटील, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य प्रा. सी. एन. चौधरी, शांताराम चौधरी, सुधीर जगन्नाथ पाटील, अशोक अंबादास शिंपी, ॲड. महेश पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, डॉ. जे. व्ही. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. माणिक पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जे. डी. गोपाळ यांनी मानले.
कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. राजेश वळवी, डॉ. शरद पाटील, प्रा. अतुल पाटील, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. स्वप्नील भोसले, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अमित गायकवाड, प्रा. अतुल सूर्यवंशी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद