प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी भडगाव पोलीस स्टेशन व महिला दामिनी संघ आयोजित ‘माझी मुलगी – माझा अभिमान’ उपक्रमातून सशक्त समाजाचा संदेश

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल

भडगाव | प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनी सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी, भडगाव पोलीस स्टेशन व महिला दामिनी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “माझी मुलगी – माझा अभिमान” हा स्त्री सशक्तीकरणाचा, सामाजिक प्रबोधनाचा व महिलांच्या सुरक्षिततेचा ठाम संदेश देणारा कार्यक्रम आदर्श कन्या विद्यालय, कोळी रोड, भडगाव येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव मा. श्री. विजयकुमार ठाकूरवाड, तहसीलदार भडगाव मा. सौ. शितल सोलाट, पोलीस निरीक्षक मा. श्री. महेश शर्मा, पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. सुशील सोनवणे तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक मा. सौ. लक्ष्मी कंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून महिलांच्या सन्मान, सुरक्षा व सक्षमीकरणासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे (महाराष्ट्राचा फायर ब्रँड) यांचे प्रभावी व सडेतोड व्याख्यान. त्यांनी मुलींचे शिक्षण, आत्मसन्मान, स्वसंरक्षण व निर्णयक्षमता या विषयांवर रोखठोक विचार मांडत समाजाने मानसिकता बदलण्याची गरज अधोरेखित केली. “मुलगी सक्षम झाली तरच कुटुंब, समाज आणि देश सशक्त होईल,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
आदर्श कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी, पालक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर आयोजित हा उपक्रम केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकाला अंतर्मुख करणारा ठरला. “माझी मुलगी – माझा अभिमान” हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद