नाशिक जिल्हा पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न...! समाजसेविका, अभिनेत्री व पत्रकार मंदा दीपक पवार यांना ‘पत्रकार समाजभूषण’ पुरस्कार
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य न्यूज चॅनल
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक स्टार न्यूज व राष्ट्रीय प्रेस महासंघ – स्टार न्यूज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक जिल्हा पत्रकार सन्मान सोहळा दिनांक १८ रोजी रोटरी क्लब हॉल, गंजमाळ येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात समाजसेविका, अभिनेत्री व पत्रकार मंदा दीपक पवार यांना पत्रकार समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान नगरसेविका हिमगौरी आडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सपकाळे, पोलिस सहायक आयुक्त संदीप मिटके, दैनिक महासागरचे संपादक जयंत महाजन, प्राचार्य श्रीकांत सोनवणे, शरद तायडे, शरद आलई, नाशिक स्टार न्यूजचे संचालक विलास सूर्यवंशी, प्रदेशाध्यक्ष दिलीप दीक्षित, प्रदेश उपाध्यक्ष अनिल वैद्य, उपाध्यक्ष किशोर दीक्षित, शहराध्यक्ष राजेश गोसावी, डॉ. रेश्मा घोडेराव, क्राइम रिपोर्टर तबरेज शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात शंभर पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीकांत सोनवणे होते. पत्रकार समाजाच्या कार्याची दखल घेत अशा उपक्रमांचे महत्त्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाध्यक्ष विलास सूर्यवंशी यांनी आभार मानले. त्यानंतर उपस्थित मान्यवर व पत्रकारांनी प्रीतिभोजनाचा आस्वाद घेतला.
या यशस्वी आयोजनासाठी स्टार न्यूज परिवारातील राजेश गोसावी, दीपक भावसार, संजय राजगुरू, सदाशिव जगताप, विलास बोरसे, सोनू आडके, नानासाहेब देवरे, संदीप जोजारे, राजेंद्र दोंदे, मोसिन पठाण, कोमल वाकचौरे, माधुरी निकम व महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पत्रकार विक्रम गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment