प्रभाग क्रमांक ३ चा विश्वास आरोग्य सभापतीपदावर—सतीष आबा चेडे यांची निवड
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा नगरपरिषदेच्या आरोग्य सभापतीपदी प्रभाग क्रमांक ३ चे लोकप्रिय नगरसेवक श्री. सतीष आबा चेडे यांची निवड झाल्याने शहरातील राजकीय व सामाजिक वर्तुळात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. जनतेच्या विश्वासावर आणि सातत्यपूर्ण कार्यावर आधारित ही निवड मानली जात असून, आरोग्य विषयक प्रश्नांना आता अधिक सक्षम दिशा मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सामान्य नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्या मार्गी लावण्यासाठी ओळखले जाणारे नगरसेवक म्हणून सतीष आबा चेडे यांची वेगळी ओळख आहे. स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा तसेच सार्वजनिक आरोग्याच्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. त्याच कार्याची दखल घेत त्यांच्यावर आरोग्य सभापतीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आरोग्य सभापतीपदाच्या माध्यमातून पाचोरा शहरातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा, स्वच्छतेवर भर, आजार प्रतिबंधक उपाययोजना तसेच नागरिकाभिमुख उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नगरपरिषदेत त्यांच्या अनुभवाचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास नगरसेवक, पदाधिकारी व नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल सतीष आबा चेडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पाचोरा शहराच्या आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment