डॉ. झेरवाल यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलजवळ व कृष्णापुरी परिसरात नाला स्वच्छता मोहीम; काटेरी झाडे हटवून आरोग्यदृष्ट्या दिलासा


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल 

पाचोरा | प्रतिनिधी
शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने डॉ. झेरवाल यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलजवळील नाला तसेच कृष्णापुरी परिसरात नाला सफाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या आसपास साचलेला कचरा, गाळ व दुर्गंधीमुळे निर्माण झालेली समस्या लक्षात घेता संबंधित नाल्याची सखोल साफसफाई करण्यात आली असून नाला मोकळा करण्यात आला आहे.
तसेच कृष्णापुरी येथील गुलाम गोश खाटकी यांच्या घराजवळील नाल्यात वाढलेली काटेरी झाडे काढण्याचे काम सुरू असून, त्यामुळे डास व संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्माण झालेल्या समस्यांबाबत आरोग्य सभापती श्री. आबासो सतीश चेडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार प्रशासनाने तातडीने दखल घेतली.
संबंधित विभागामार्फत नाल्याची साफसफाई करून तक्रारीचे निवारण करण्यात येत असून, परिसरात स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, अशा स्वच्छता उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.😊🤝👌🏼🙏🏼🌹

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद