त्र्यंबक नगरात प्रॉपर्टी चेंबरमधील पाणी गळतीचा प्रश्न मार्गी; नगरसेवक तथा आरोग्य सभापती आबासो. सतीष चेडे यांच्या तक्रारीची तत्काळ दखल
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा शहरातील त्र्यंबक नगर परिसरात, अश्विनी ऑटो मागील गल्लीतील प्रॉपर्टी चेंबरमध्ये साचलेले पाणी व त्यातून होणारी गळती नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. या बाबत नगरसेवक तथा आरोग्य सभापती आबासो. सतीष चेडे यांनी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्यात आली.
नगरपालिकेच्या पथकाने सदर प्रॉपर्टी चेंबरमधील साचलेले पाणी पास करून गळ बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे परिसरातील दुर्गंधी व आरोग्याच्या दृष्टीने निर्माण झालेला धोका कमी झाला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
नगरसेवक तथा आरोग्य सभापती आबासो.सतीष चेडे यांनी नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असून, भविष्यातही अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment