पाचो-याच्या शिक्षण धोरणाची सूत्रे आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांच्या हाती
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी :
पाचोरा नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ चे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांची नगरपरिषदेच्या शिक्षण सभापतीपदी निवड झाल्याने नगरराजकारणात शिक्षण विषयाला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासू, लोकाभिमुख आणि कृतीशील नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या आयु. ब्राह्मणे यांच्या खांद्यावर आता शहराच्या शैक्षणिक धोरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शहरातील शाळांची भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षकांचे प्रश्न आणि पालकांचा विश्वास या सर्व बाबी एकत्रितपणे हाताळत ठोस निर्णय घेण्याचा स्पष्ट निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. केवळ पदासाठी नव्हे तर परिणामकारक बदल घडविण्यासाठीच ही जबाबदारी स्वीकारल्याचे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे.
नगरपरिषदेत शिक्षण विषयावर आतापर्यंत केवळ औपचारिकता दिसून येत असताना, आयु. प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांच्या निवडीमुळे या विभागात कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणामाभिमुख प्रशासनाची अपेक्षा निर्माण झाली आहे.
या राजकीय यशाबद्दल पाचोरा शहरातील नागरिक, सहकारी नगरसेवक, शिक्षकवर्ग व समर्थकांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या कार्यकाळात शहराच्या शिक्षण क्षेत्रात मूलभूत व दूरगामी बदल घडतील, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment