रोटरी क्लब पाचोरा–भडगावची समाजसेवेची रेल्वेगती.....! पाचोरा रेल्वे स्टेशनला व्हीलचेअर व स्ट्रेचर भेट

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
रोटरी क्लब पाचोरा–भडगावच्या सेवाभावी उपक्रमांतर्गत पाचोरा रेल्वे स्टेशन येथे वयोवृद्ध, आजारी व दिव्यांग प्रवाशांच्या सुविधेसाठी २ व्हीलचेअर व २ स्ट्रेचर भेट देण्यात आले. हा उपक्रम रो. प्रा. नितीन सोनवणे यांच्या सौजन्यातून त्यांच्या कै. आई–वडिलांच्या स्मरणार्थ राबविण्यात आला.
या कार्यक्रमास रेल्वेचे जनरल मॅनेजर विवेक कुमार गुप्ता, भुसावळ विभागाचे डीआरएम निखिल अग्रवाल, तसेच पाचोरा स्टेशन प्रबंधक विजय पाटील यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रोटरी क्लब पाचोरा–भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी यांच्यासह रोटरी सदस्य भरत सिनकर, प्रा. नितीन सोनवणे, निलेश कोटेचा, डॉ. गोरख महाजन, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. अमोल जाधव, पिंकी जिनोदिया, संजय कोतकर, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. राहुल काटकर, नितीन जमदाडे, नितीन तायडे, उज्वल ठाकरे, पुंडलिक पाटील, ज्ञानेश्वर पाचोळे, लक्ष्मण जाधव, चेतन सरोदे, लिलाधर सरोदे यांची उपस्थिती लाभली.
तसेच अखिल भारतीय प्रांत सचिव डॉ. अनिल देशमुख, तालुकाध्यक्ष संजय पाटील, शरद गीते, चिंधु मोकळ, सुधाकर पाटील यांच्यासह रोटरी क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.
रोटरी क्लबच्या या मानवतावादी उपक्रमाचे रेल्वेचे जनरल मॅनेजर विवेक कुमार गुप्ता यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्टेशन प्रबंधक विजय पाटील यांनी रेल्वे प्रशासनाच्या वतीने आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद