जागृती विद्यालयात विधी सेवा शिबिर : विद्यार्थ्यांना कायदेशीर हक्क, कर्तव्ये व संरक्षण कायद्यांची माहिती
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा तालुका विधी सेवा समिती तसेच पाचोरा तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागृती विद्यालय, देशमुखवाडी (पाचोरा) येथे विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत, कर्तव्यांबाबत तसेच संरक्षणात्मक कायद्यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. ललिताताई पाटील उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेले मूलभूत हक्क, जबाबदाऱ्या तसेच समाजात सुरक्षित व जागरूक नागरिक म्हणून कसे वागावे याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी मानवी तस्करीविरोधात जागृती करत विद्यार्थ्यांनी कोणत्या परिस्थितीत सावध राहावे, संशयास्पद बाबी कशा ओळखाव्यात याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात पाचोरा तालुका वकील संघाच्या उपाध्यक्ष सौ. कविता रायसाखडा, समाजसेविका वैशालीताई जडे, ॲड. मालखेडे सर, डॉ. मुकेश नैनाव, प्रकाश विसपुते सर यांचीही उपस्थिती लाभली. रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ.मुकेश नैनाव, प्रकाश विसपुते सर व ॲड. मालखेडे सर यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, बालहक्क तसेच मूलभूतअधिकारांबाबत सोप्या भाषेत माहिती देत कायदेशीर संरक्षणाची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक टी. आर. पाटील यांनी केले. समारोपप्रसंगी मुख्याध्यापक सावंत सर यांनी सर्व मान्यवर, मार्गदर्शक व उपस्थितांचे आभार मानून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागरूकता वाढते, असे मत व्यक्त केले.
Comments
Post a Comment