३१ वर्षांच्या अनुभवाचा शैक्षणिक वारसा; पाचोरा कन्या विद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शिवाजी शिंदे


राजेंद्र खैरनार सत्य शोध न्यूज चॅनल मुख्य संपादक
पाचोरा | प्रतिनिधी
नगरदेवळा येथील विश्वासराव पवार ट्रस्ट संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, पाचोरा येथे प्राचार्यपदाची धुरा अभ्यासू, अनुभवी व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. शिवाजी शिंदे यांच्या हाती सोपविण्यात आली आहे. निवृत्त प्राचार्या श्रीमती उज्वला देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर पदोन्नतीने डॉ. शिवाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
३१ वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव असलेले डॉ. शिवाजी शिंदे हे नामांकित गिरणाई शिक्षण संस्थेचे सहसचिव म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी इंग्रजी विषयात एम.ए., बी.एड. पदवी संपादन केली असून, अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये एम.डी. तसेच ॲक्युप्रेशर विषयात पीएच.डी. मिळवली आहे.
एक अभ्यासू शिक्षक म्हणून ओळख असलेले डॉ. शिंदे हे नामांकित पत्रकार, संवेदनशील कवी व उत्कृष्ट निवेदक म्हणूनही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात परिचित आहेत. विद्यार्थिनी-केंद्रित शिक्षण, गुणवत्तावाढ व सर्वांगीण विकास यावर त्यांचा विशेष भर राहिलेला आहे.
डॉ. शिवाजी शिंदे यांच्या नियुक्तीमुळे पाचोरा कन्या विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
✍️
राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद