पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे श्रद्धा-परंपरेचा जागर; श्री शिवचंद्र मौळी महादेव मंदिरात भव्य जिणोधार सोहळा
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड हे गाव पुन्हा एकदा श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक भक्तिभावाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. गावातील श्री शिवचंद्र मौळी भगवान महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला भव्य जिणोधार सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, तो ग्रामसंस्कृतीचा आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव ठरणार आहे.
पिढ्यान्पिढ्या जपलेल्या परंपरेतून उभा राहिलेला हा सोहळा समाजाला एकत्र बांधणारा आहे. मंदिराच्या जिणोधाराच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाणार असून, शिवनामाचा गजर आणि विधींची पवित्रता अनुभवायला मिळणार आहे.
सोहळ्याच्या प्रथम दिवशी विधिवत पूजन, शोभायात्रा व धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाची मंगल सुरुवात होणार आहे. परंपरेनुसार होणारे विशेष धार्मिक विधी भाविकांसाठी आकर्षण ठरणार आहेत.
द्वितीय दिवशी अभिषेक, पूजा, आरती, कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून अध्यात्मिक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. अनुभवी कीर्तनकारांच्या सान्निध्यात भक्ती आणि संस्कारांचा संदेश दिला जाणार आहे.
तृतीय दिवशी आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून, सकाळपासून रात्रीपर्यंत भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.
हा जिणोधार सोहळा केवळ देवपूजेपुरता मर्यादित नसून, तो समतेचा, बंधुत्वाचा आणि ग्रामएकतेचा संदेश देणारा आहे. महाप्रसादाच्या माध्यमातून सर्व समाजघटक एकत्र येतात, हे या परंपरेचे खरे वैशिष्ट्य आहे.
टिप :
ज्या ग्रामस्थांना महाप्रसादासाठी धान्य किंवा देणगी स्वरूपात मदत करायची असेल त्यांनी संपर्क साधावा –
📞 9130313542 / 9822368272
Comments
Post a Comment