काही दिवसांपासून ‘आपले सरकार डिजिटल सेवा केंद्र – कॉमन सर्व्हिस सेंटर’ जनतेच्या सेवेत


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल

पाचोरा प्रतिनिधी:-
तरुण भारतचे पत्रकार सुरेश तांबे यांचे सुपुत्र प्रा. शुभम सुरेश तांबे यांच्या पुढाकारातून उपक्रम
पाचोरा शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे ‘आपले सरकार डिजिटल सेवा केंद्र – कॉमन सर्व्हिस सेंटर’ हे केंद्र गेल्या काही दिवसांपासून यशस्वीपणे जनतेच्या सेवेत कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय व विविध डिजिटल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश या सेवा केंद्रामागे आहे.
सदर सेवा केंद्राचे प्रोप्रायटर प्रा. शुभम सुरेश तांबे, प्रा. मनीषा कुणाल तांबे व प्रा. चिरज सुरेश तांबे असून, हे केंद्र तरुण भारत या नामांकित दैनिकाचे पाचोरा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. सुरेश तांबे यांच्या सुपुत्र प्रा. शुभम सुरेश तांबे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून सुरू करण्यात आले आहे.
या डिजिटल सेवा केंद्रामार्फत पॅन कार्ड, आधार कार्ड प्रिंट व दुरुस्ती, लाईट बिल भरणा, मोबाईल रिचार्ज, पी.एम. किसान नोंदणी, आयुष्मान भारत कार्ड, ई-श्रम कार्ड, मतदान कार्ड नवीन व दुरुस्ती, विविध विमा योजना, बँकिंग व मनी ट्रान्सफर सुविधा, रेल्वे, बस व विमान तिकीट बुकिंग तसेच शासकीय व खासगी सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज व फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
आजच्या डिजिटल युगात नागरिकांना शासकीय कामांसाठी विविध कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, वेळ व खर्च वाचावा तसेच योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हे सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार युवक व ज्येष्ठ नागरिक यांना या केंद्राचा मोठा लाभ होत असून, अल्प शुल्कात व विश्वासार्ह सेवा मिळत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
सदर आपले सरकार डिजिटल सेवा केंद्र – कॉमन सर्व्हिस सेंटर
छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पाठीमागे, तहसील कार्यालयाजवळ, पाचोरा येथे कार्यरत असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवा केंद्र संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद