पाचोरा नगरपालिकेत नवे पर्व सुरू; नवनिर्वाचित नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला पदभार
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा नगरपालिकेच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ सुनिताताई पाटील, उपनगराध्यक्ष, किशोर आप्पा बारावकर,आणि सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच शिंदे शिवसेना गटाचे स्वीकृत सदस्य श्री शरद भाऊ पाटे,ॲड.श्री योगेश(दादुवकील)पाटील व भाजपाचे स्विकृत सदस्य ॲड.श्री अविनाश सुतार यांनी मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे साहेब यांच्या दालनात औपचारिकरित्या पदभार स्वीकारत नगरपालिकेच्या कारभाराची अधिकृत सुरुवात केली.
पहिल्याच बैठकीत शहराच्या विकासाचा आराखडा, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व प्रशासनातील पारदर्शकता या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. शहराचा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी पाचोरा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी उपस्थितांचे आभार मानत, नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारा, लोकाभिमुख व गतिमान कारभार करण्याचे आश्वासन दिले.
नव्या नेतृत्वाखाली पाचोरा नगरपालिकेचा कारभार अधिक प्रभावी, जबाबदार व विकासाभिमुख होईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.
— राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
Comments
Post a Comment