उज्वल जैन नवयुग मंडळाच्या अध्यक्षपदी रोशन पारख; पाचोरातील नवयुवक चळवळीला नवे बळ


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल

पाचोरा | प्रतिनिधी : 
पाचोरा येथील जैन समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक चळवळीत सक्रीय असलेल्या उज्वल जैन नवयुग मंडळाच्या २०२६ वर्षासाठी अध्यक्षपदी श्री. रोशन दिलीपजी पारख यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या या नवयुवक मंडळाने समाजहितासाठी अनेक उपक्रम राबवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
‘झाडे लावा, झाडे जगवा’सारखे पर्यावरणपूरक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांद्वारे मार्गदर्शन, विविध शैक्षणिक व सामाजिक स्पर्धांमध्ये युवकांचा सहभाग वाढविणे, अशा अनेक विधायक कार्यांमुळे उज्वल जैन नवयुग मंडळ पाचोरात आदर्श मानले जाते. दरवर्षी नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून नव्या जोमाने काम करण्याची परंपरा मंडळाने जपली आहे.
याच पार्श्वभूमीवर २०२६ साठी अध्यक्ष म्हणून निवड झालेले रोशन पारख हे सामाजिक कार्यात सक्रिय असून ते लंडन किड्स स्कूलचे संचालक आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, समाजप्रती असलेली बांधिलकी आणि नेतृत्वगुण याची दखल घेत मंडळाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीचे पाचोरा शहरात व जैन समाजात सर्वत्र स्वागत होत असून, यावेळी मंडळाचे संचालक मंडळ व वरिष्ठ मार्गदर्शक नेमीचंद शेठ बाफना, नीरज भाऊ मुनोत, मनोज भाऊ बांठिया, राजेंद्र सेठ संघवी, कांतीलालजी बाफना आदी मान्यवर उपस्थित होते.
रोशन पारख यांच्या नेतृत्वाखाली उज्वल जैन नवयुग मंडळाचे सामाजिक, शैक्षणिक व युवकाभिमुख कार्य अधिक व्यापक व प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद