विचारांची धार, शब्दांची ताकद; राज्यस्तरावर चेतना हिरेची छाप!राष्ट्रीय कॉलेज, चाळीसगाव येथे काल संपन्न

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल

राष्ट्रीय कॉलेज, चाळीसगाव येथे काल संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे हिने आपल्या अभ्यासपूर्ण व प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावत राज्यस्तरावर पाचोरा महाविद्यालयाची मान उंचावली.
“नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : शिक्षणातील क्रांती की गोंधळ?” या ज्वलंत व चिंतनशील विषयावर चेतनाने सादर केलेले भाषण मुद्देसूद, तर्कसंगत आणि विचारप्रवर्तक ठरले. विषयाची सखोल समज, स्पष्ट विचारमांडणी आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण यामुळे तिचे वक्तृत्व परीक्षकांसह उपस्थित श्रोत्यांवर ठसा उमटवणारे ठरले.
या उल्लेखनीय यशाबद्दल कु. चेतना हिरे हिला सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह तसेच रोख रक्कम रुपये १५००/- देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी संघप्रमुख प्रा. सुजाता पवार, प्रा. जयश्री वाघ व प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून चेतनाच्या तयारीला योग्य दिशा दिली.
चेतनाच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला नवी ऊर्जा मिळाली असून तिच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल महाविद्यालय व संस्थेच्या परिवारातर्फे तिचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद