आज महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त (रेझिंग डे) पाचोरा पोलीस स्टेशन येथे कै. सु. भा. पाटील विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृती उपक्रम संपन्न..!
(राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल)
पाचोरा | प्रतिनिधी :
महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त (रेझिंग डे) पाचोरा पोलीस स्टेशन, पाचोरा (जि. जळगाव) यांच्या वतीने जनजागृती सप्ताह विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे.
या जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने शहरातील देशमुखवाडी येथील सहकारी शिक्षण संस्था संचलित कै. सु. भा. पाटील विद्यामंदिर येथील इयत्ता ४ थी वर्गातील विद्यार्थी प्रत्यक्ष पाचोरा पोलीस स्टेशन येथे भेट देण्यासाठी उपस्थित होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे व पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीची प्रत्यक्ष ओळख करून देणे हा होता.
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस विभागाची कार्यपद्धती, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, महिला व बालक सुरक्षा, सायबर गुन्हेगारी तसेच वाहतूक नियम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना कारागृह व्यवस्था, गोपनीय विभागाची कार्यपद्धती, दगडफेक व दंगलप्रसंगी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल तसेच विविध प्रकारची हत्यारे यांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. या माध्यमातून कायदा कसा राबवला जातो, याची समज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात आली.
या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक श्री. कृष्णाची घायाळ साहेब तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत आदर, शिस्त, जबाबदारी व सामाजिक भान निर्माण व्हावे, यावर विशेष भर देण्यात आला.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला साळुंखे, श्रीमती वर्षा पाटील, शिक्षक श्री. संदीप वाघ आदी उपस्थित होते. शिक्षक श्री. संदीप वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना,
“तुम्ही देशाचे उज्ज्वल भविष्य आहात. कायद्याचे पालन करणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे,” असे सांगत पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पाचोरा पोलीस स्टेशनतर्फे इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे शाळा प्रशासन व पालक वर्गातून स्वागत करण्यात येत असून, पोलीस व समाज यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, हाच या जनजागृती उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
पोलीस व नागरिक यांच्या समन्वयातूनच सुरक्षित, निर्भय व सुसंस्कृत समाजनिर्मिती शक्य आहे, असा सकारात्मक संदेश या महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त देण्यात आला.

Comments
Post a Comment