पत्रकार दिनी ‘त्रिमूर्ती ऑनलाइन सर्व्हिसेस’चा शुभारंभ; डिजिटल सेवांचा नागरिकांना एकाच ठिकाणी लाभ
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्युज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
पत्रकार दिनाच्या औचित्याने शहरात डिजिटल व शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचाव्यात या हेतूने ‘त्रिमूर्ती ऑनलाइन सर्व्हिसेस (CSC)’ या सेवा केंद्राचा आज शुभारंभ करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन सर्व पत्रकार बांधव व जेष्ठ पत्रकारांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.
‘आपले सरकार’ तसेच CSC – Digital India या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सुरू झालेल्या या केंद्रामार्फत नागरिकांना पॅनकार्ड नवीन/दुरुस्ती, आधार कार्ड प्रिंट, मतदान कार्ड, ई-श्रम कार्ड, लाईट बिल, प्रधानमंत्री किसान योजना, शॉप अॅक्ट लायसन्स, उद्योग आधार, उत्पन्न, जात व डोमिसाईल दाखले, ७/१२ व ८अ उतारे, जीवन (हयात) प्रमाणपत्र, रेल्वे तिकीट बुकिंग, रेशन कार्ड ऑनलाईन, सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज, फॉर्म भरणे, लॅमिनेशन, झेरॉक्स व मोबाईल प्रिंट आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या केंद्रामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचा वेळ, श्रम व खर्च वाचणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. पत्रकार दिनीच या सेवा केंद्राचा शुभारंभ होणे ही पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना तत्पर, विश्वासार्ह व दर्जेदार सुविधा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी पत्रकार बांधव, जेष्ठ पत्रकार, नागरिक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रोप्रायटर / संचालक संपर्क माहिती :
प्रा. प्रा. नंदकुमार शेलकर (पत्रकार)
📞 मोबा. : 7588079846
प्रा. प्रा. प्रवीण बोरसे (पत्रकार)
📞 मोबा. : 9096242002
प्रा. प्रा. राहुल महाजन (पत्रकार)
📞 मोबा. : 9860632676
Comments
Post a Comment