लुंकड कन्या शाळेतील ‘ज्ञानदान’ उपक्रम ठरतोय प्रेरणादायी; विद्यार्थिनींच्या पुढाकारातून वाचनसंस्कृतीला चालना


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चैनल
जळगाव | प्रतिनिधी
पं. न. लुंकड कन्या शाळेत विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानाची कास धरण्याचा प्रेरणादायी उपक्रम सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. केवळ सण-समारंभ साजरे करण्यापुरते मर्यादित न राहता, वाढदिवस व विशेष प्रसंगी वर्ग ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देण्याची अभिनव संकल्पना विद्यार्थिनींनी प्रत्यक्षात उतरवली आहे. या उपक्रमातून ‘वस्तूपेक्षा विचार महत्त्वाचा’ हा संदेश प्रभावीपणे दिला जात आहे.
इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी नियती पाटील व आरोही माळवटकर यांनी पुढाकार घेत वर्ग ग्रंथालयासाठी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिली. या पुस्तकांचा वापर करून विद्यार्थिनी नियमित वाचन करू लागल्या असून, त्यांच्या विचारक्षमतेत, भाषिक कौशल्यात व आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होत आहे.
या उपक्रमात विद्यार्थिनींसोबतच वर्ग शिक्षक  यांचे मार्गदर्शन आणि शाळा प्रशासनाची साथ लाभत आहे. वर्ग शिक्षक श्री प्रविण धनगर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, मुख्याध्यापिका राजश्री शिंदेकर, उपमुख्याध्यापक अनिल सैंदाणे व पर्यवेक्षिका लीना कुलकर्णी यांच्या प्रोत्साहनामुळे उपक्रमाला सातत्य मिळाले आहे.
‘ज्ञानदान’ या विचारातून घडणारा हा उपक्रम शाळेच्या चौकटीपलीकडे जाऊन समाजाला दिशा देणारा ठरत असून, लुंकड कन्या शाळेचा हा आदर्श इतर शैक्षणिक संस्थांसाठी अनुकरणीय ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद