क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरीपाचोरा येथे प्रतिमा पूजन व अभिवादन

( राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा | प्रतिनिधी
दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा शहरातील महात्मा फुले स्मारक, स्टेशन रोड येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून विधिवत प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी माननीय माजी नगरसेवक वासुदेव महाजन, प्रकाश बळीराम महाजन, राजेंद्र सांडू माळी, नाना फकीरा महाजन, चिंधु बळीराम मोकळ, अशोक शिवलाल महाजन, डॉ. गोरख महाजन, जगन्नाथ महाजन तसेच सौ. सुनंदाताई मधुकर महाजन यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास नगराज भिका महाजन, संतोष महाजन, सुनील महाजन, कन्हैया देवरे, सुनील उमाळे, प्रकाश विसपुते यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन के. एस. महाजन, अध्यक्ष – माळी समाज पंच मंडळ यांच्या वतीने करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समाजसुधारणा व स्त्रीसशक्तीकरणाच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांना अनुसरण्याचा संकल्प व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद