पाचोरा येथील मंडळ अधिकारी श्री. विजय येवले यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न


 राजेंद्र खैरनार मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी:-
पाचोरा येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले मंडळ अधिकारी श्री. विजय येवले यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा सोहळा शहरातील व्यापारी भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तहसीलदार श्री.विजय बनसोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ येथील महिला तहसीलदार, नायब तहसीलदार श्री. विनोद कुमावत, डॉक्टर श्री. शरद वाणी, श्री. राजेंद्र चिंचोले सर यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व तलाठी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीर्घकालीन व प्रामाणिक सेवेसाठी श्री. विजय येवले यांचा तहसीलदार साहेब तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटना, पत्रकार बांधव तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. विजय येवले यांच्या सेवाकाळातील कार्याची सर्व उपस्थितांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद