स्व.खंडु पाटील निवासी मंतीमंद विध्यालय दोंडाईचा यांना दिक्षा अभियान सर्टिफिकेट देण्यात आले...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा प्रतिनिधी:-
दिनांक ४/७/२०२५ शुक्रवार रोजी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छ . संभाजीनगर संचलित स्व. खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा,जि - धुळे ह्या शाळेला सन 2024 /25 ह्या शैक्षणिक वर्षात दिशा अभियान अंतर्गत मा. श्री एम.व्ही.पावरा साहेब ( दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धुळे जिल्हा ) व मा .श्री निलेश चव्हाण सर (राज्य समन्वयक दिशा अभियान) यांच्या हस्ते दिशा अंमलबाजवणी शाळा म्हणून सर्टिफिकेट देण्यात आले . सदर सर्टिफिकेट संस्थेचे संचालक मा.श्री शुभमराव साळुंके सर ,संस्थेच्या उपाध्यक्षा मा. श्रीमती रुपालीताई साळुंके पाटील मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे मॅडम, दिशा स्कूल ऍडमिन श्रीमती मनीषा घुगे मॅडम,विशेष शिक्षक श्री कमलेश निकम सर कलाशिक्षक श्री प्रदीप बोरसे सर यांनी आनंदाने स्विकारले . शाळेला सलग तिन वर्षे सर्टिफिकेट मिळाले त्याबद्दल मा.श्री निलेश चव्हाण सर यांनी शाळेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थाअध्यक्ष मा. श्री शिवाजीराव सांळुके पाटील साहेब यांनी शाळेतिल शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देखील शुभेच्छा दिल्या श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा
Comments
Post a Comment