प्रवासी रिक्षा चोरी करणारे आरोपी अखेर जेरबंद......!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
जळगाव जिल्हयात प्रवासी रिक्षा चोरीचे गुन्हे होत असल्याने मा.डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, यांनी श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन सूचना दिल्या, त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रवासी रिक्षा चोरी करणारे आरोपी निष्पन्न करण्याबाबत सुचना दिल्या, त्याप्रमाणे दि.०३/०७/२०२५ रोजी पिंप्राळा हुडको, जळगाव भागात राहणारे 1) सादिक अली सैय्यद अली वय 40 मूळ रा. पिंप्राळा हुडको, 120 खोल्या अली मशिद जवळ, जळगाव ता. जि. जळगाव ह.मु. अक्सा नगर, मेडीकल जवळ, वरणगाव ता. भुसावळ जि. जळगाव त्यांचा भाऊचा मुलगा विधी संघर्षीत बालक अशांनी नाशिक व चाळीसगाव शहरातून 02 प्रवासी रिक्षा चोरी करुन त्या रिक्षा त्यांचे कडेस आहे अशी गोपनिय बातमीदारा मार्फत पोहेको अक्रम याकुब शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर बातमी मा.श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना कळविल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील एक पथक तयार करुन त्यांना शोध घेवून त्यांना स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कार्यालयात चौकशी कामी आणले असता त्यांनी कबुल केले की, 7/8 दिवसापुर्वी आम्ही दोघांनी नाशिक रोड, जि. नाशिक येथून 01 रिक्षा व चाळीसगाव शहरातुन 01 रिक्षा चोरी केलेल्या आहेत. त्या रिक्षा आम्ही घरा समोर लावलेल्या आहेत, आरोपी नं.01 याचा पुतण्या आसिफ अली उस्मान अली याने सदर दोन्ही रिक्षा हजर केल्याने त्या चाळीसगाव शहर पो.ग्टे, CCTNS नं.272/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) या गुन्हयांत एकूण 1,10,000/- रुपये किंमतीच्या बजाज कंपनीच्या 02 प्रवासी रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी नं. 1) सादिक अली सैय्यद अली वय 40 मुळ रा. पिंप्राळा हुडको, 120 खोल्या अली मशिद जवळ, जळगाव ता. जि. जळगाव ह.मु. अक्सा नगर, मेडीकल जवळ, वरणगाव ता.भुसावळ जि. जळगाव यास चाळीसगाव शहर पो.स्टे.ला वरील गुन्हयांचे तपास कामी ताब्यात देण्यात आले आहे.

तसेच सदर आरोपी नं.01 याचे कडून मिळालेल्या माहिती वरुन पिंप्राळा हुडको परिसरातील 1) नरेंद्र भिमराव अहिरे वय 30 रा.न्यु दूध फेड्रेशन पिंप्राळा हुडको, जळगाव ता.जि. जळगाव, 2) सुनिल गोकुळ भालेराव वय 27 रा. बौध्द बसाहत पिंप्राळा हुडको, जळगाव ता. जि. जळगाव, 3) शब्बीर सुपडू पठाण वय 34 रा.न्यु खाजा नगर, पिंप्राळा हुडको बिल्डींग नं.3 रुम नं.20 जळगाव ता.जि. जळगाव यांचे कडेस सुध्दा चोरीच्या रिक्षा आहेत असे सांगितल्याने वरील आरोपीतांना त्यांचे ताब्यात असलेल्या प्रवासी रिक्षासह चौकशी कामी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कार्यालयात आणले असता त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या प्रवासी रिक्षा यांची खात्री केली असता त्यांचे इंजिन नंबर, चेसिस नंबर व आरटीओ नंबर हे वेगवेगळे असून त्यांचे कोणतेही मुळ कागदपत्र त्यांचे कडे मिळून आले नाही. किंवा ते त्या रिक्षांचा मालकी हक्क सिध्द करु शकले नाही म्हणून त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या एकूण 1,20,000/- रुपये किंमती 03 प्रवासी रिक्षा जप्त करण्यात आल्या असून त्याबाबत रामानंदनगर पो.स्टे.ला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 प्रमाणे तिन्ही आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही मा.डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, श्री.अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि श्री. शरद बागल, पोउनि. श्री. सोपान गोरे, सफौ/अतुल वंजारी, पोहेकों/सुनिल दामोदरे, अक्रम याकुब शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, पोकों/किशोर पाटील, रविंद्र कापडणे, चापोकों/ महेश सोमवंशी यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद