आज दिनांक ६ जुलै २०२५ रविवारी सालाबादप्रमाणे यंदाही "माऊली गृप व बहुळेश्वर गृप तर्फे" आषाढी एकादशी निमित्त भारत डेअरी स्टाप ,अश्विनी ऑटो मोबाईसमोर साबूदाणा खिचडी,केळी व फराळ वाटप कार्यक्रम हा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला...!



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)

पाचोरा प्रतिनिधी:

(पाचोरा प्रतिनिधी दिनांक ६ जुलै २०२५):- पाचोरा शहरातील कृष्णापुरी चौफुलीवर भारत डेअरी स्टाप,अश्विनी ऑटोमोबाईल समोर १८ वर्षांपासून  आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) निमित्त "माऊली गृप व बहुळेश्वर गृप तर्फे साबुदाण्याची खिचडी, केळी, इ. स्वरुपात फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, याची पुर्व तयारी ही "माऊली गृप व बहुळेश्वर गृप चे सर्व सन्माननीय सदस्य, कार्यकर्ते यांनी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांना उपवासाचा फराळ मिळावा यासाठी गेल्या अठरा  वर्षापुर्वी श्रीगणेशा केला होता.
त्या फराळ महाप्रसादाचे पंधरा ते विस दिवसाआधी नियोजन केले जाते.या फराळाच्या कार्यक्रम ला खुप दानी हे दान आवर्जून करतात. म्हणून यावर्षी पाचोरा, भडगाव, चाळीसगाव परिसरातील भाविक भक्त आषाढी एकादशी च्या दिवशी पायी / प्रवास करुन 
दर्शनासाठी जातात या शुभ पर्वाचे शुभऔचित्य साधून वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ६/७/२०२५रविवारी सकाळी ९:०० वाजता विठ्ठल माऊली च्या मुर्ती चा दुध दहीने सार्वजनिक अभिषेक आरती करुन  “माऊली गृप  व बहुळेश्वर गृप" तर्फे  फराळाच्या प्रसाद चा भोग हा विठ्ठल माऊली ला देऊन फराळ वाटपाला सुरुवात केली गेली,
  पाचोरा तहसिलदार श्री बनसोड साहेब हे परिवारासह येऊन त्यांनी दर्शन घेऊन फराळ घेतला. 

 राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी फराळाचा प्रसाद घेतला.
या कार्यक्रमाला माऊली गृपचे व  बहुळेश्वर गृप चे सर्व भाविक, कार्यकर्ते, पदाधिकारी ,सदस्य तसेच परिसरातील सर्व युवा जेष्ठ भाविक कार्यकर्ते, सदस्य यांचे अथक परिश्रमासह अमुल्य सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद