पाचोरा हादरले...! शहरातील बसस्थानक प्रवेशद्वार जवळ सिनेस्टाईल गोळीबार ,या गोळीबारात तरुण जागीच ठार, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:-

पाचोरा शहरामधील रहदारीच्या बस स्थानक परिसरात शुक्रवारी, 4/7/2025 शुक्रवार रोजी संध्याकाळी 6.00 वाजेच्या सुमारास थरारक घटना घडली. दोन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवरून येत गावठी कट्ट्याने एका 27 वर्षीय तरुणावर 12 राऊंड फायर केले. या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे.

मृत तरुणाचे नाव आकाश कैलास मोरे (वय 27, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, आकाश संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास बसस्थानकावर आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी गेला होता. त्याच वेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी अचानक त्याच्यावर गोळीबार सुरू केला. गावठी कट्ट्याने डोक्यावर, कपाळावर, पाठीवर, छातीवर एकूण १२ गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्यांचा मारा इतका भीषण होता की, आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

गोळीबारानंतर दोन्ही मारेकरी सुसाट वेगाने घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस प्रशासन त्वरित  घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवत, परिसरातील सी.सी.टीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले होते.

या थरारक घटना मागचे मुख्य कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, या घटनेनंतर जनतेत भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी पाचोऱ्यामध्ये  दाखल….

गोळीबार मध्ये एका तरुणाची हत्या झाली असल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे त्वरित पाचोरा येथे घटना स्थळी दाखल झाले होते, पसार झालेल्या संशयित मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी 2 पथक तयार करण्यात आले असून पथक त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद