आषाढी एकादशी निमित्त पिंपळगाव हरेश्वर व अंतुर्ली येथे महाआरतीचा भव्य सोहळा — हजारोंच्या उपस्थितीत संतपरंपरेला सलाम...!




(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)

पिंपळगाव हरेश्वर / अंतुर्ली | दिनांक : ५ जुलै २०२५
आषाढी एकादशी म्हणजेच भक्ती, श्रद्धा, आणि वारकरी परंपरेचा पवित्र उत्सव! या निमित्ताने पिंपळगाव हरेश्वर येथील प्रति पंढरपूर येथे आणि अंतुर्ली गावात आज मोठ्या भक्तिभावाने महाआरती पार पडली.
पिंपळगाव हरेश्वर येथे महाआरती:
येथील महाआरती आमदार कार्यसम्राट किशोर आप्पा पाटील, खासदार सौ. स्मिता ताई वाघ, तसेच माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.
दुपारी बारा वाजता विठुरायाच्या गजरात ही महाआरती पार पडली आणि उपस्थित वारकऱ्यांनी ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘जय जय रामकृष्ण हरी’ चा अखंड जयघोष केला.
अंतुर्ली येथे ऐतिहासिक महाआरती:
दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे अंतुर्ली गावातील १०० वर्षांची परंपरा असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही महापूजा सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाली.
महाआरतीचे सौभाग्य आमदार किशोरआप्पा पाटील व सौ. सुनीताताई किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते पार पडले.
👥 प्रमुख मान्यवर व उपस्थिती:
या दोन्ही ठिकाणी हजारो वारकरी भाविकांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित होते:
शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील
सुनील पाटील,
जनसेवक बंडू भाऊ सोनार,
अतुल पाटील,
तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हरिपाठाच्या अखंड स्वरात, हा भक्तिभावाचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावागावांतून आलेल्या वारकऱ्यांनी ही परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
"अशा प्रकारे पिंपळगाव हरेश्वर आणि अंतुर्ली या दोन्ही ठिकाणी भक्तीमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. पुढील वर्षीही अशीच भक्ती, श्रद्धा आणि एकोप्याची जाणीव ठेवत परंपरा अखंड सुरू राहो... विठ्ठल नामाचा गजर अखंड चालू राहो!"

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद