सुवर्ण संयोग! वाढदिवसाच्या दिवशीच ‘महासंमेलन पश्चिम महाराष्ट्र समन्वयक’ म्हणून सौ. शर्मिला ताई खांडके यांची नियुक्ती..!

 
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
अहिल्या नगर प्रतिनिधी: सुमित्रा बगाडे
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन, नागपूर यासाठी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक पदी सौ. शर्मिला ताई खांडके यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या कार्यक्षमतेला आणि नेतृत्वगुणांना मिळालेली मान्यता होय.  विशेष म्हणजे, आज ताईंचा वाढदिवस असून, हाच दिवस त्यांच्या नव्या जबाबदारीच्या सुरुवातीचा ठरला आहे. हा दिवस म्हणजे एक सुवर्ण क्षण, एक साजेसा योग ठरला आहे.  ताईंच्या शांत, समर्पित आणि प्रभावी नेतृत्वामुळे समाजकार्याच्या क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातून होणारा सहभाग निश्चितच महासंमेलनासाठी मोलाचा ठरेल.     🌼 सौ. शर्मिला ताई खांडके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि नवीन नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संत नामदेव महाराजांच्या कृपेने यश, आरोग्य व भरभराटीच्या शुभेच्छा! *.           संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन आयोजन समिती (IND)*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद