पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी कॉलेज शाळा आवारात टवाळक्या करणाऱ्या मुलांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी व महिला कर्मचारी यांची केली नियुक्ती...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(शब्दांकन:अनिल आबा येवले)
 पाचोरा पोलीस स्टेशनला नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार यांनी आपल्या कामाचा धडाका लावला असून गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी सर्व प्रयत्न करीत असून त्यांनी प्रथम कॉलेज,शाळा केंद्रा वर परीक्षा चालू असून एक पोलीस अधिकारी व महिला कॉस्टेबल तसेच पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करून कॉलेज आवारात व शाळा आवारात कोणीही टवाळकी करणारे किंवा मुलींची छेडछाड करणारे यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधिकारी व महिला कर्मचारी यांची नियुक्ती केली असून ते दररोज शाळा कॉलेज या ठिकाणी संस्थेचे चेअरमन मुख्याध्यापक शिक्षक यांना भेटून काही अडचणी असल्यास आम्ही हजर आहोत या उपक्रमामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना दिलासा मिळाला असून त्यांनी बिनधास्त राहावे काही अडचण असल्यास संबंधित अधिकारी पोलीस कर्मचारी व पाचोरा पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद