पाचोऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय आरोग्य शिबिर संपन्न...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा, 2 जुलै 2025: आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनसेवक नितीन डी. तायडे यांच्या सौजन्याने पाचोरा येथे एकदिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात संभाजीनगर येथील महिला, बांधकाम कामगार, तसेच पुरुष आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सुमित किशोर आप्पा पाटील मा. नगराध्यक्ष संजय गोहिल , अमित भाऊ वाणी यशवंत पाटील, नितीन तायडे, सचिन पाटील, निखिल पवार, चेतन चौधरी, पप्पू चौधरी अनिल बाबा पवार शेखर महाजन शांताराम महाजन आणि मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले. या शिबिरात उपस्थितांना आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना समाजातील सर्व स्तरांतील लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या कटिबद्धतेवर भर दिला. नितीन तायडे यांनीही जनसेवेच्या माध्यमातून अशा उपक्रमांना पाठिंबा देत राहण्याचे आश्वासन दिले.
या शिबिरामुळे स्थानिक नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळाला असून, अशा सामाजिक उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment