पाचोरा पोलीस स्टेशनला आज योगायोग आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार यांनी स्विकारला 'पोलिस निरीक्षक' पदाचा पदभार...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:-
पाचोरा येथील पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांची बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार यांची ६/७/२०२५रविवार रोजी आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर योगायोग पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती झाली असून श्री राहुल कुमार पवार यांनी २००६ मध्ये पोलीस भरती पीएसआय म्हणून त्यांची नियुक्ती झाली असता त्यांचा पोलीस खात्यात १९ वर्षाचा अनुभव असून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक पोलीस स्टेशन केलेले असून वादग्रस्त असलेले व दक्षलवादी असलेले गडचिरोली या जिल्ह्यात त्यांनी ४ वर्ष सेवा केली असून भुसावळ ३ दोन वर्ष,नगर जिल्हा कोपरगाव २ वर्ष नगर एलसीबी ८ महिने नगर जिल्ह्यात एमआयडीसी २ वर्ष धुळे जिल्हा निजामपूर ३ महिने एस आय टी धुळे ३ महिने नंदुरबार जिल्हा तालुका पोलीस स्टेशन १ वर्ष तळोदा शहर १ वर्ष व त्यानंतर त्यांची बदली चाळीसगाव ग्रामीण १ वर्ष व आता पाचोरा पोलीस स्टेशनला नुकतेच रुजू झाले असून यांचे मुळगाव कळवण तालुक्यातील आभोणे असून त्यांचे शिक्षण कळवण येथे एम एस सी ऍग्रो बॉटनी हा त्यांचा स्पेशल विषय होता.
त्यांनी एमपीएससी मार्फत परीक्षा देऊन त्यांची पीएसआय पदी नियुक्ती झाली होती. त्यांनी आपल्या १९ वर्षाच्या कारकीर्दीत अनेक पोलीस स्टेशन केलेले असून एक अभ्यासू व कर्तव्यदक्ष अधिकारी, मितभाषी स्वभावाचे आहेत त्यांची नुकतेच त्यांचा पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment