डी. वाय.एस.पी. धनंजय येरुळे साहेबांना चित्ररूपात साकारण्याचा वैष्णवी दातीर चा प्रयत्न.......!
पाचोरा प्रतिनिधी
उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री. धनंजय येरुळे, पाचोरा यांचा सेवापूर्ती सोहळा 1 जुलै 2025 मंगळवार रोजी उत्साहात सन्मानाने पार पाडण्यात आला.
या सोहळ्यात विविध अधिकारी, सहकारी, पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली.
यात वेगळेपण होते ते श्री.देवेंद्र दातीर (रिटायर्ड सहाय्यक फौजदार -ASI ) यांची कन्या 🎨 वैष्णवी दातीर हिने साकारलेली कलाकृती.
वैष्णवीने श्री.येरुळे साहेबांचे व सोबत त्यांच्या धर्मपत्नी सौ.येरुळे मॅडम यांचे पेन्सिल शेडींगच्या माध्यमातून हुबेहूब चित्र साकारले. या चित्रातील बारकावे आपण ZOOM करून निश्चित बघू शकतात.
वैष्णवी ने नुकतीच fine Art cet दिली आहे. ती चित्रकलेत करियर करणार आहे. जिथे मुलं किंवा त्यांचे पालक चित्रकलेत करियर म्हटली की नाक मुरडले जाते तिथे वैष्णवी व तिचे पालक करियर म्हणून या क्षेत्राची निवड करतात ही निश्चितच वाखाणण्याजोगी बाब आहे. वैष्णवी रंगश्री आर्ट फाउंडेशन या ड्रॉइंग क्लास ची विद्यार्थिनी असून तिला श्री. सुबोध कांतायन सरांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Comments
Post a Comment