गिरणाई शिक्षण संस्था संचलीत कै. पि.के. शिंदे माध्य.विद्यालय येथे आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांसह वारी काढण्यात आली... या चिमुकल्यांच्या च्या हरी नामाच्या गजर,घोषणाबाजी ने पाचोरा शहरास आले पंढरपुराचे स्वरूप..!




(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा शहरातील गिरणाई शिक्षण संस्था पाचोरा संचलीत कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालय पुनगाव रोड येथील विद्यालयात आज दिनांक ५ जुलै २०२५ शनिवारी आषाढी एकादशी निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांची पुनगाव रोड मार्गे पायी वारी काढण्यात आली.

    या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पावलांची  पायी वारी ही आदर्श काॅलनी, लक्ष्मीबाई नगर मार्गाने भडगाव रोड, युवा नेते श्री. अमोल शिंदे यांच्या निवासस्थाना कडुन काढण्यात आली, यात विद्यार्थ्यांनी वासुदेवाची,महाराष्ट्रीयन व वारकरी वेशभूषा धारण केलेली होती.ताल मृदुंगाच्या ,विनाच्या तालावर व जय हरी विठ्ठल,जय हरी माऊलीच्या , हरीनामाच्या गजराने ,घोषणाबाजीने  भक्तीमय वातावरणाचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाचोरा शहराला पंढरपूर चे स्वरूप आले होते , ह्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची वारी ही युवा नेते श्री.अमोल भाऊ शिंदे यांच्या निवासस्थाना जवळ आल्यावर  वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे पुष्पांच्या वर्षावात स्वागत केले गेले. नंतर आषाढी वारी व  विठू नामाच्या गजरात  मार्गस्थ झाली. यावेळी मृदूंग, टाळ सोबत विद्यार्थ्यांनी ठेका व ताल घेत उत्कृष्ठ रिंगण प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भडगांव रोड, गजानन डेअरी मार्गे विद्यालयात आषाढी  वारी(दिंडी)ची सांगता झाली.


या प्रसंगी गिरणाई शिक्षण संस्था पाचोरा संचलित
कै.पि.के.शिंदे माध्य. विद्यालय पाचोरा
संस्थापक अध्यक्ष तात्यासो. श्री पंडीतराव शिंदे,ॲड.जे.डी.काटकर
( सचिव),
युवा नेते अमोलभाऊ शिंदे , श्री निरजभाऊ मुणोत (उपाध्यक्ष),प्रा.डॉ. शिवाजी शिंदे (सहसचिव) ,
श्री.जी.व्ही.सोमवंशी(मुख्याध्यापक), श्री व्ही.पी.देशमुख(पर्यवेक्षक), उपस्थित होते. व त्यांनी या वारकरी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.वारी(दिंडी) यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कसोशीने सर्वांनी प्रयत्न केले.
पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद