ओसवाल मित्र मंडळ मुंबई व रोटरी सिनियर्स दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने मेथी येथे मोफत नोटबुक वाटप..!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा प्रतिनिधी: पांडुरंग शिंपी
दोंडाईचा ( दि.२/७/२०२५) मुंबई येथील ओसवाल मित्र मंडळ तसेच दानशूर उद्योजक अजित कुचेरीया यांच्या दातृत्वाने रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सच्या यांच्या सहकार्याने जय बालाजी माध्यमिक विद्यालय मेथी येथे शाळेतील सर्व ४०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६ एकुण २४०० नोटबुक वाटप करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन ओसवाल मित्र मंडळाचे तसेच रोटरी सिनियर्सचे माजी अध्यक्ष सौरभ मुणोत कार्यकारी सचिव रविंद्र पाटील सार्जंट अमरीश जैन ग्रिटींग कमेटी चेअरमन दिनेश कर्नावट नुतन सदस्य संजय शर्मा मुख्याध्यापिका सौ सैदांणे मँडम इ मान्यवर उपस्थित होते.
     अध्यक्षस्थानावरुन बोलतांना प्रविण महाजन यांनी सांगितले की ओसवाल मित्र मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने दरवर्षी परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप होत असते गरजु विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन लाभ घ्यावा व आपले जिवन सुखी करावे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जय बालाजी माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी वृंद अहिंसा परिवाराचे एस पी पाटील सर व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले✍️✍️ *श्री पांडुरंग शिपी पत्रकार दोंडाईचा*.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद