पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नगरसेवक संजय एरंडे यांच्या प्रवेशानंतर उमेश एरंडे व मित्र परिवाराचा शिवसेना शिंदे गटात मोठ्या संख्येने प्रवेश...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
(पाचोरा) पाचोरा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर एकनिष्ठ समर्थक व माजी नगरसेवक संजय एरंडे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर, त्यांचे जेष्ठ चिरंजीव उमेश एरंडे यांच्यासोबत त्यांच्या मित्र परिवारानेही मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात जंगी प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला . या सोहळ्यास पाचोऱ्याचे लोकप्रिय कार्यसम्राट हॅट्रीक आमदार मा.किशोर पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, स्विय सहाय्यक राजेश पाटील,शिवसेना शहराध्यक्ष सुमित सावंत व युवा सेनेचे जय बारावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रवेश सोहळ्यात उमेश एरंडे यांच्यासह विशाल जाधव, प्रमोद महाले, विवेक मराठे, सनी कलाल, विकी वारुळे, शिवम देसले, सौरभ पाटील, अमोल पाटील, प्रफुल पाटील, शुभम शिंदे, बंटी पाटील, अबीद शेख, शुभम देठे, गौरव पाटील, मनोज बडगुजर, तुषार नैनाव, आकाश दत्तू आणि प्रसाद पाटील यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत, स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना, “पाचो-यातील कार्यकर्त्यांचा हा प्रवेश शिवसेना शिंदे गटाची सामर्थ्य वृद्धीगंत करणारा असून संजय एरंडे यांच्यासोबत त्यांचे जेष्ठ चिरंजीव उमेश एरंडे तसेच त्यांच्या मित्र परिवाराच्या प्रवेशामुळे पाचोरा तालुक्यामध्ये पक्षाला नवीन सामर्थ्य मिळेल. आम्ही सर्वजण एकतेने जनतेच्या कल्याणासाठी व विकासासाठी एकजुटीने कार्य करू अशी ग्वाही प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनापासुन व्यक्त करण्यात आली आहे.
हा प्रवेश सोहळा पाचोरा तालुक्यामधील शिवसेना शिंदे गटाचे वाढत्या प्रभावाचे द्योतक मानला जात आहे. येणाऱ्या भावी काळात या नवीन कार्यकर्त्यांच्या जोमाने पक्षाला स्थानिक पातळीवर अधिकाधिक सामर्थ्य मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment