पाचोरा येथे आज अतुल संघवी व प्रशांत अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचा मतदारांशी थेट संवाद...!शनिवार बाजारात,मंडीसह शहरभर फेरी...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:-
पाचोरा पीपल्को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २०२५-२०३० निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनल तर्फे आज दिनांक ६/७/२०२४ शनिवार बाजारात,मंडीत व शहरात मतदारांशी थेट संपर्क साधण्यात आला. या प्रचारफेरीत सहकार पॅनलचे प्रमुख नेते श्री. अतुलभाऊ संघवी तसेच श्री.
प्रशांतभाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संचालक मंडळ सहभागी झाले होते.
प्रचार दौऱ्यात पॅनलच्या कार्यकर्त्यांनी पाचोरा शहरातील व्यापारी पेठ, भाजी मंडई, जामनेर रोड, स्टेशन रोड, गांधी चौक, प्रकाश टॉकीज रोड, सब्जी मंडी मार्केट आदी प्रमुख भागात फेरी मारून सर्व व्यापारी, ग्राहक, ज्येष्ठ नागरिक व मतदारांना थेट भेट देऊन संपर्क साधला.
या प्रसंगी सहकार पॅनलच्या वतीने नागरिकांना विनंती करण्यात आली की, गांधी चौक, प्रकाश टॉकीज रोड, सब्जी मंडी मार्केट आदी प्रमुख भागात फेरी मारून सर्वच व्यापारी, ग्राहक, ज्येष्ठ नागरिक व मतदारांना थेट भेट दिली.
या वेळी सहकार पॅनलच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले की,
"बँकेच्या विकासासाठी, विश्वसनीय नेतृत्वासाठी आणि पारदर्शक व्यवस्थापनासाठी सहकार पॅनलचे नऊही उमेदवार निवडून द्या व आपले बहुमोल मत हे भरघोस मतदान करून बँकेच्या सुवर्णमय वाटचालीस आपला हातभार लावा."
Comments
Post a Comment