दिनांक 6 जुलै 2025 रविवारी सालाबादप्रमाणे यंदाही "माऊली गृप व बहुळेश्वर गृप तर्फे" आषाढी एकादशी निमित्त भारत डेअरी स्टाप ,अश्विनी ऑटो मोबाईसमोर साबूदाणा खिचडी,केळी व फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
(पाचोरा प्रतिनिधी दिनांक 6 जुलै 2025):- पाचोरा शहरातील कृष्णापुरी चौफुलीवर भारत डेअरी स्टाप,अश्विनी ऑटोमोबाईल समोर अनेक वर्षांपासून म्हणजेच सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) निमित्त "माऊली गृप व बहुळेश्वर गृप तर्फे साबुदाण्याची खिचडी, केळी, इ. स्वरुपात फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, याची पुर्व तयारी ही "माऊली गृप व बहुळेश्वर गृप चे सर्व सन्माननीय सदस्य, कार्यकर्ते यांनी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांना उपवासाचा फराळ मिळावा यासाठी गेल्या काही वर्षापुर्वी श्रीगणेशा केला होता.
त्या फराळ महाप्रसादाचे पंधरा ते विस दिवसाआधी नियोजन केले जाते.या फराळाच्या कार्यक्रम ला खुप दानी हे दान आवर्जून करतात. म्हणून यावर्षी पाचोरा, भडगाव, चाळीसगाव परिसरातील भाविक भक्त आषाढी एकादशी च्या दिवशी पायी / प्रवास करुन
दर्शनासाठी जातात या शुभ पर्वाचे शुभऔचित्य साधून वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे उद्या सकाळी ६/७/२०२५रविवारी सकाळी १०:०० आयोजित केलेला असून “माऊली गृप व बहुळेश्वर गृप" तर्फे भाविकांना फराळाच्या प्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान सह साग्रह विनंती केली आहे. या कार्यक्रमाला माऊली गृपचे व बहुळेश्वर गृप चे सर्व भाविक, कार्यकर्ते, पदाधिकारी ,सदस्य तसेच परिसरातील सर्व युवा जेष्ठ भाविक कार्यकर्ते, सदस्य यांचे अथक परिश्रमासह अमुल्य सहकार्य लाभते.
Comments
Post a Comment