पाचोरा येथे मा.दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली भाजप सदस्य ऑनलाइन अभियानास कार्यकर्त्यांचा प्रचंड संख्येने प्रतिसाद...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी)
पाचोरा येथील माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश घेतल्यानंतर भाजपा पक्ष वाढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असून येणाऱ्या निवडणुकीत सर्व भाजपा निवडणुका काबीज करण्यायासाठी जोरदार स्वरुपात तयारी सुरू केली असून आज दिनांक २१/६/२०२५ शनिवार रोजी भाजपाचे ऑनलाईन नोंदणी सुरू असून राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित असताना अनेक कार्यकर्त्यांना भाजपा सदस्य नोंदणीस प्रचंड प्रतिसाद मिळत असून महिला वर्ग सुद्धा उपस्थित असून महिला सुद्धा भाजपा सदस्य होत आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांचा एकच नारा "जय श्रीराम" यावेळी सदस्य दोन्ही साठी माजी आमदार दिलीप वाघ,पीटीसी चेअरमन संजु नाना वाघ,माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे माजी पंचायत समिती सभापती सुभाष भाऊ मुंडे,माजी नगरसेवक सनी वाघ,नंदू सोमवंशी, प्रदीप नाना पाटील डॉ. शांतीलाल तेली सुदाम वाघ रणजीत पाटील सर, रमेश वाणी भोला अप्पा चौधरी श्री हारून देशमुख शिवदास पाटील,नगरसेवक तसेच शेतकीसंघ संचालक शरदभाऊ पाटील, पप्पू भाऊ पाटीलयावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच सुचिता ताई वाघ ,ज्योतीताई वाघ, सरलाताई पाटील, सुरेखाताई पाटील, जयश्री दीपमाला पाटील, सुवर्णा पाटील ,सुनिता मांडोळे व वैशू ताई जडे, बोरकर मॅडम अनिता देवरे, रेखा देवरे इ. महिला मोठ्या उपस्थित होते.
Comments
Post a Comment