रामेश्वरममध्ये जनसेवक बंडू सोनार यांच्या यशासाठी तरुणांचे साकडे – पाचोर्यातून उमटतेय जनतेचा आवाज...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा, दि. 25 जून 2025 (सकाळी 10 वा.): पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये सध्या एकच नाव चर्चेत आहे – बंडूभाऊ केशव सोनार! जनसेवेची निःस्वार्थ भावना, सातत्याने समाजासाठी केलेलं कार्य आणि कुठलंही पद नसताना कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता दिलेली सेवा यामुळे बंडू सोनार यांनी लोकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून बंडूभाऊ सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत. गरजूंसाठी मदतीचा हात, रुग्णांसाठी तातडीची मदत, तसेच नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्याची तत्परता – यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर जनतेचा भरवसा वाढला आहे.
याच पार्श्वभूमीवर, प्रभाग आठमधील नागरिकांच्यावतीने बंडू सोनार हे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या तिकिटावर आणि कार्यसम्राट आमदार मा. किशोरआप्पा पाटील यांच्या आशीर्वादाने उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे, पाचोर्यातील जय अविनाश सोमवंशी आणि त्यांच्या सोबतचे अनेक तरुण रामेश्वरम (तामिळनाडू) येथील पवित्र रामनाथस्वामी मंदिरात गेले असता, त्यांनी भगवान महादेवाचे दर्शन घेतले आणि बंडू सोनार यांना यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळो, अशी मनोभावे प्रार्थना केली. हे साकडे म्हणजे बंडूभाऊंवरील जनतेचा विश्वास आणि आस्था अधोरेखित करणारी घटना म्हणावी लागेल.
बंडू सोनार यांची लोकप्रियता केवळ त्यांचं कामच नव्हे तर त्यांची नम्रता, सर्वसामान्यांशी असलेला संपर्क आणि आपुलकीने केलेली जनसेवा पाहता, येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
"काम बोलतंय!" या उक्तीला साजेसं व्यक्तिमत्त्व म्हणजेच बंडूभाऊ सोनार – हे आज पाचोर्याच्या जनतेच्या मनात अधोरेखित होताना दिसत आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील जनतेचा बंडूभाऊंना पाठिंबा - बंडू भाऊंची वाढती लोकप्रियता -
रामेश्वरम येथे देवाकडे साकडं – तरुणांची अनोखी भक्ती
शिवसेना व आमदार किशोरआप्पा पाटील यांचा आशीर्वाद अपेक्षित
निवडणुकीत विजयाच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता
बंडू सोनार यांचं नाव केवळ एक राजकीय उमेदवार म्हणून नव्हे, तर एक खऱ्या अर्थाने "जनतेचा सेवक" म्हणून पुढे येत आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी आणि यश या दोहोंकडे पाचोर्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment