कै.पि.के.शिंदे माध्य. विद्यालय, पाचोरा येथील शिक्षक डी.आर.कोतकर यांचा सेवानिवृत्त सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी):
पाचोरा शहरातील कै. पि. के. शिंदे माध्य. विद्यालयातील शिक्षक श्री. ज्ञानेश्वर रघुनाथ कोतकर हे नियत वयोमानानुसार दि. ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्त सेवापूर्ती सोहळा आयोजीत केला आहे.
या सेवानिवृत्ती सोहळा निमित्ताने त्यांच्या शिक्षक जीवनातील काही आठवणी व कार्याचा मोजक्या शब्दात लेखाजोखा मांडला आहे.
कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा येथील गणित/ विज्ञान विषयाचे उपशिक्षक, राज्यस्तरीय मार्गदर्शक शिक्षक, अभ्यासू व्यक्तिमत्व,श्री. डी. आर. कोतकर सर दिनांक ३१ मे २०२५ रोजी शनिवारी नियत वयोमानानुसार २५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.सरांनी त्यांच्या उपशिक्षक सेवा कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडवून जणू समाजाचे ऋणच फेडलेले आहे.
त्यांनी त्यांच्या सेवा काळात सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले. त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. ते लाडशाखीय वाणी समाज युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष देखील होते. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व ३१ में २०२५ शनिवारी सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांचे सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य आनंदाचे भरभराटीचे सुख-समृद्धीचे व निरामय जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना!*
सरांच्या सेवापुर्ती सोहळ्यास खूप- खूप शुभेच्छा...
श्री.डी आर. कोतकर सरांचा सेवानिवृत्ती सोहळा आशिर्वाद हॉल, भडगांव रोड, पाचोरा.२२ जून २०२५, रविवार सकाळी ९.३० वा.आयोजित करण्यात आला आहे सेवानिवृत्ती सोहळा मा. श्री. तात्यासाो. पंडितराव परशराम शिंदे (संस्थापक अध्यक्ष गिरणाई शिक्षण संस्था, पाचोरा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
समारंभाचे अध्यक्ष म्हणून मा. आमदार श्री. सत्यजीत तांबे (विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य),या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.श्री.बापुसाो. सतिष परशराम शिंदे (चेअरमन - गिरणाई नागरी सह. पतसंस्था, पाचोरा),विशेष अतिथी म्हणून मा.श्री.दादासाो. राजेंद्र पाचपुते (अध्यक्ष, स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्था, धुळे),मा. अमोल पंडीतराव शिंदे (युवा नेते, पाचोरा),प्रा.श्री. राजेंद्र जनार्दन चिंचोले (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक)
प्रमुख पाहूणे म्हणून मा. श्री. अॅड.जे.डी. काटकर (सचिव गिरणाई शिक्षण संस्था, पाचोरा),मा.प्रा.डॉ.श्री.शिवाजी शिंदे (सहसचिव, गिरणाई शिक्षण संस्था, पाचोरा),मा. श्रीमती सरोज आर. गायकवाड (शिक्षण विस्तार अधिकारी, पाचोरा),मा.श्री. निरज पी. मुणोत (उपाध्यक्ष, गिरणाई शिक्षण संस्था, पाचोरा),मा. समाधान एस. पाटील (गटशिक्षणाधिकारी, पाचोरा),मा.अभिजीत ए. खैरनार (केंद्रप्रमुख, भातखंडे),मा.सर्व संचालक मंडळ गिरणाई शिक्षण संस्था, पाचोरा
विनीत म्हणून पर्यवेक्षक व्ही.पी. देशमुख सर, मुख्याध्यापक जी.व्ही. सोमवंशी आणि सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद
कार्यक्रमानंतर लगेच स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
Comments
Post a Comment