पाचोरा येथील अतुल संघवी यांनी वडिलांचा वारसा जपून समाजसेवेचे कार्य चालू ठेवले जनतेच्या हितासाठी मदत करणे हेच उद्दिष्ट समोर ठेवले...! त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द....!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) शब्दांकन:-अनिल आबा येवले 
पाचोरा प्रतिनिधी:
 पाचोरा येथील अतुल संघवी यांनी आपल्या वडिलांचा समाजसेवेचा वारसा जपून आपले कार्य करीत राहिले त्यांनी आपली सुरुवात सामाजिक कार्य तसेच राजकीय जीवनात यशस्वी होऊन सर्वपक्षीय संबंध ठेवून हितसंबंध जपले त्यांनी आपल्या पाचोरा पीपल बँक पहिलीच निवडणूक पॅनल लढवून सर्व पॅनल चे उमेदवार निवडून आले होते व त्यांची चेअरमन पदी निवड झाल्यानंतर त्यांनी पाचोरा पीपल बँक प्रगती पथावर आणून शेअर सभासदांना डिव्हीडंट देण्यासाठी कटिबद्ध राहिले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना मानसन्मान देऊन गिफ्ट देण्यात आले तसेच सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बँक कशी सुरळीत व नफ्यात राहील याकरिता वेळोवेळी बैठका घेऊन मार्गदर्शन केले तसेच पीपल्स बँकेच्या सभासदांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले व पीपल बँकेचे अनेक ठिकाणी शाखा सुरू केल्या तसेच अतुल संघवी यांनी पाचोरा एम.एम. कॉलेजला व्यायाम करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून दिले तसेच पाचोरा पोलीस स्टेशनला त्यांनी कॉम्प्युटरचे साहित्य दिले तसेच अनेक शाळांना त्यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना गणवेश शालेय दप्तर तसेच कॉम्प्युटर सुद्धा उपलब्ध करून दिले श्री अतुल भाऊ संघवी एक दानशूर व्यक्तिमत्व असून "दिलखुलास व्यक्तिमत्व" तन-मन-धन या गोष्टी त्या मनापासून मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात.त्यांच्या डिक्शनरीत दुश्मनी हा शब्द नसून "फक्त मैत्री" अतिशय गोड स्वभाव चेहऱ्यावर नेहमी हास्य त्यांना आज वाढदिवसानिमित्त आमदार श्री किशोर आप्पा पाटील माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ श्री अमोल भाऊ शिंदे श्री वैशालीताई तसेच सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मंडळी वकील मंडळी डॉक्टर मंडळी तसेच विविध बँकेचे चेअरमन संचालक संस्था चालक या सर्वांनी त्यांना आज शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद