छ.संभाजीनगर जिल्हा. पत्रकार सुरक्षा समिती सदस्य पदी जिवन आनंदराव मावस यांची नियुक्ती .

 
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी.
 नंदकुमार बगाडे पाटील.
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जिवन आनंदराव मावस यांची छ.संभाजीनगर जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती सदस्य पदी निवड करण्यात आली.
 यावेळी, गंगापूर तालुका पुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व युवक पत्रकार. जिवन आनंदराव मावस यांची निवड करण्यात आली.
 यावेळी गंगापूर तालुका ढोरेगाव येथे पत्रकार सुरक्षा समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती नंदकुमार बगाडे हे होते. 
 बगाडे पुढे म्हणाले की, मावस यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील पत्रकारितेमध्ये आणि सामाजिक शैक्षणिक धार्मिक,अधिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक बहुजन समाजावर होणाऱ्या अन्यायात्याचाराला वाचा फोडून आणि विविध शासकीय योजनेचे फायदे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे कार्य केले. मावस यांनी विविध शासकीय योजनेचे फायदे सर्वसामान्य जनतेला मिळवून त्यांनी शासन दरबारी प्रश्न मांडून गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय दिला.
 अत्यंत गरिबीच्या, हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी कमी वयातच पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.
 त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन 
 प्रदेशाध्यक्ष यशवंतराव पवार साहेब पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशावरून आणि पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हा अध्यक्ष. नंदकुमार बगाडे यांच्या  शिफारशी अनुस्वारून  मावस यांची छ.संभाजीनगर जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.
 जिवन मावस यांना पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष नंदकुमार बगाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
 यावेळी प्रमुख पाहुणे. श्री.अविनाश राऊत.(पुरी,सरपंच) श्री.रवी आढागळे. (पिंपळवाडी, सरपंच)श्री. सुदामराव आढागळे (पिंपळवाडी) 
 शाहरुख पटेल( पुरी) अमोल हिवाळे( गंगापूर) तालुका युवक सामाजिक कार्यकर्ते शाहुल खंडागळे (पुरी) दिनकर राऊत (पुरी)आणि राहुल आढागळे (पिंपळवाडी). आदी मान्यवर उपस्थित होते.
छ.संभाजीनगर येथे पत्रकार सुरक्षा समिती मध्ये अनेकांना संधी देण्याचे आश्वासन नंदकुमार बगाडे पाटील यांनी केले.
संपर्क -९८२२५३८४१५

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद