आज पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु.भा.पाटील प्रा.विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
शालेय प्रवेशोत्सव 2025- 26 आणि नवागतांचे स्वागत 
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु.भा.पाटील प्रा.विद्यामंदिर येथे आज दिनांक 16-06-2025 सोमवार रोजी सन 2025-26 या नवीन शैक्षणिक वर्षातील तिन्ही विभागातील( मुख्य बिल्डिंग,भडगाव रोड ,दुपार सत्र) विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे समन्वयक जिभाऊ श्री एस. डी .पाटील सर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला साळुंखे मॅडम  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
                 यावेळी महिला शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्या काढून ...शालेय परिसर सुशोभित केला. इ  १ ली च्या विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉईंटही चा आनंद घेतला .तसेच श्री एस. डी.पाटील सर यांनी सकाळ सत्र व भडगाव रोड विभागात तर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला साळुंखे मॅडम यांनी दुपार सत्र विभागात विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि खाऊ  आणि शालेय पुस्तके यांचे वाटप करून  स्वागत केले.या वेळी सर्व सहकारी शिक्षकांचे सहकार्य लाभले.....

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद