लोहारा येथील अनाथ मुलीला शालेय साहित्य वाटप.....! समाजसेवा हीच ईश्वर सेवा...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
लोहारा(पाचोरा) प्रतिनिधी:
आई वडिलांचे बालपणीच छत्र हरवणाऱ्या (आई वडील मृत पावलेल्या)
कु. हिमानशी महेश खैरनार इयत्ता ४थी ब मराठी मुलींची कन्याशाळा लोहारा तालुका पाचोरा येथील या विद्यार्थिनीस सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता अण्णाभाऊ दगडू बेलदार तथा अध्यक्ष :-  कुमावत बेलदार समाज सेवा संघ पाचोरा तालुका यांच्या संकल्पनेतून उपविभागीय अधिकारी सो पाचोरा भाग पाचोरा (प्रांत कार्यालय) येथील कार्यरत नायब तहसीलदार मा. श्री. सुभाषजी कुंभार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व कु.हिमानशी महेश खैरनार लोहारा तालुका पाचोरा यांची आजी गं.भा. रत्‍नाबाई दिलीप सूर्यवंशी यांनी लोहारा गावातील भाऊ, दादा, आप्पा, यांना भ्रमणध्वनीवरून सांगितले की, माझ्या नातीला शालेय साहित्य घेण्यासाठी मदत करा परंतु कोणीही सदरच्या अनाथ विद्यार्थिनींना मदत केली नाही म्हणून दिनांक २२/६/२०२५ रोजी कु. हिमानशी महेश खैरनार हिच्या आजीने मला फोन करून सांगितले की, हिमानशीला शालेय साहित्य मिळवून देण्यासाठी माझ्या नातीला मदत करा मित्रांनो, मी क्षणाचाही विलंब न लावता उपविभागीय अधिकारी कार्यालय पाचोरा (SDM) पाचोरा भाग पाचोरा येथील कार्यरत असलेले नायब तहसीलदार मा. श्री. सुभाषजी  कुंभार यांना भ्रमणध्वनीवरून सदर विद्यार्थ्यांनीस आपल्याला शालेय साहित्य घ्यायचे आहे व तिला आपल्याला मदत करायची आहे असे मी सांगून उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांनी मला आज रोजी भ्रमणध्वनी वरून फोन करून सांगितले की, अण्णाभाऊ आज आपल्याला तुम्ही सांगितलेल्या अनाथ विद्यार्थिनीला शालेय साहित्य खरेदी करावयाचे आहे म्हणून आज दि.२४/०६/२०२५ रोजी मराठी मुलींची कन्या शाळा लोहारा तालुका पाचोरा येथे सदर अनाथ कु.हिमानशी महेश खैरनार या विद्यार्थिनीस दप्तर, स्टील वॉटर बॅग, स्टीलचा डबा (टिफिन), कंपास पेटी, पॅड, चार रेघी 200 पेजेस १ वही, बॉक्स वही 200 पेजेस १ , एक रेघी २००पेजेस २ वह्या, चित्रकला एक मोठी वही, 

*ट्युशन वह्या*
एक रेघी २०० पेजेस ९ वह्या 
चार रेघी 100 पेजेस १ वही
दुरेघी 100 पेजेस १वही
 इयत्ता चौथी डिक्शनरी (इंदू) गणित +सायन्स +इंग्रजी हे सर्व शालेय साहित्य सदर विद्यार्थिनी स घेऊन सदर विद्यार्थ्यांनीस आज रोजी मराठी मुलींची कन्याशाळा येथे वाटप करण्यात आले सदर शालेय साहित्य वाटप प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक पवार, ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके,विविध कार्यकारी सोसायटी लोहारा येथील लिपिक मनोज अंबिकार, मराठी मुलींची शाळा उपशिक्षक कृष्णा तपोणे सर, विलास निकम सर, तेली सर, मराठी मुलींची शाळा येथील सर्व शिक्षक वृंद व मॅडम तसेच सदर विद्यार्थ्यांची आजी गं.भा. रत्‍नाबाई दिलीप सूर्यवंशी उपस्थित होते 
कु.हिमानशी महेश खैरनार (अनाथ मुलगी) हिला शालेय साहित्य वाटप केल्याबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे कौतुक होत आहे व सदर विद्यार्थिनीला अण्णाभाऊ बेलदार यांनी शुभ आशीर्वाद देऊन तुला यापुढे काहीही शैक्षणिक बाबतीत गरज वाटल्यास मला फोन कर व खूप अभ्यास करून(IAS,IPS) अधिकारी हो अशा सदिच्छा दिल्या सदरची विद्यार्थिनी ही खूप हुशार व आज्ञाधारक आहे 
तिला शिकण्यासाठी आपल्या लोहारा गावातील व मुंबई येथे नोकरीनिमित्त स्थायिक असलेले भूमिपुत्र यांनी सुद्धा सदर विद्यार्थ्यांनी स पुढील वर्षापासून आर्थिक मदत करावी जेणेकरून पाचवीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सदर विद्यार्थ्यांनीस मदत होईल हीच अपेक्षा 

अण्णाभाऊ दगडू बेलदार
सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता तथा अध्यक्ष :- कुमावत बेलदार समाजसेवा संघ पाचोरा तालुका

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद