पाचोरा परिवहन विभागातर्फे पाचोरा कनिष्ठ महाविद्यालय मोफत पास वाटप..!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा परिवहन विभागातर्फे एम. एम. कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर मोफत पास वाटपाचा कार्यक्रम नुकताच महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. या उपक्रमाचे अंतर्गत परिवहन विभागाच्या वतीने आगार व्यवस्थापक माननीय श्री. प्रकाश पाटील, कार्यशाळा सहाय्यक अधीक्षक श्री. योगेश जाधव, त्यासोबतच वाहतूक नियंत्रक श्री.गोकुळ पाटील यांना एम.एम. महाविद्यालयातर्फे उपप्राचार्य प्रा. एस.एस. पाटील पर्यवेक्षक डॉ. जे. पी. बडगुजर यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत पास वाटपाच्या या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.🙏🏻
Comments
Post a Comment